लेक लाडकी योजना 2024 : मुलींना मिळणार 1 लाख 1 हजार रुपये आजच करा अर्ज ..!

लेक लाडकी योजना माहिती मराठीत / Lek Ladki Yojana Information In Marathi 2024.

Lek Ladki Yojana Information In Marathi 2023

लेक लाडकी योजना अंतर्गत सगळ्या मुलींना 1 लाख 1 हजार रुपये दिले जाणार आहे. नजीकच्या काळात महाराष्ट्र सरकारने लेक लाडकी योजना सुरू केली आहे. या योजने अंतर्गत 5 टप्यात 1 लाख 1 हजार रुपये सर्व मुलींना मिळणार आहे. लेक लाडकी योजनेसाठी काय पात्रता आहे? कश्या प्रकारे फॉर्म भरता येईल? कोणकोणते कागदपत्रे आवश्यक असतील? यासंबंधी सर्व माहिती आजच्या पोस्टमध्ये आम्ही घेऊन आलो आहोत, त्यामुळे ही पोस्ट सुरुवातीपासून शेवटपर्यंत नीट वाचा.

लेक लाडकी योजना काय आहे? / What Is Lek Ladki Yojana In Marathi?

मित्रांनो नुकतेच महाराष्ट्र सरकारने मुलींच्या जन्मापासून मुली अठरा वर्षाच्या होईपर्यंत एक लाख एक हजार रुपये देण्याची योजना जाहीर केली आहे. 2023 च्या बजेटमध्ये महाराष्ट्र सरकारने या योजनेची घोषणा केली होती. राज्यमंडल आयोगाने या योजनेला संमती दिली आहे व माझी कन्या भाग्यश्री योजनेला देखील या योजनेत अंतर्भूत केली आहे.

महाराष्ट्रातीळ 2.3 कोटी कुटुंबांना या योजनेचा फायदा होणार आहे. महाराष्ट्रातील 2023 च्या आर्थिक सर्वे रिपोर्टनुसार 2.3 कुटुंबांकडे पांढरे किंवा रेशन केसरी राशन कार्ड आहे त्यामुळे यांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे. लेक लाडकी योजनेमध्ये गरीब घरातील मुलींसाठी जन्मापासून ते अठरा वर्षाचा होई पर्यंत 1 लाख 1 हजार रुपये पाच टप्यामध्ये देण्यात येणार आहे. या योजनेचे उद्दिष्टे मुलींचा जन्मदर वाढवणे तसेच मुलींना शिक्षणाप्रति जागरूक करणे आहे.

लेक लाडकी योजना पात्रता / लेक लाडकी योजनेचा फायदा कोणाला घेता येणार?

  1. लेक लाडकी योजनेचा लाभ महाराष्ट्र राज्यातील त्या गरीब घरातील मुलींना घेता येईल त्यांच्याकडे पांढरे किंवा केसरी रेशनकार्ड असणार आहे.
  2. लेक लाडकी योजनेचा फायदा घ्यायचा असेल तर तुमचे वार्षिक उत्पन्न 1 लाख पेक्षा जास्त नसावे.
  3. या योजनेचा फायदा 1 एप्रिल 2023 नंतर जन्म घेतलेल्या मुलींना घेता येणार आहे.
  4. कोणच्या घरी जर जुळ्या मुलींनी जन्म घेतला तर दोन्ही मुलींना लाभ मिळणार!
  5. जर कोणच्या घरी एक मुलगा व एक मुलगी जन्मली तर फक्त मुलीला या योजनेचा लाभ घेता येईल.

लेक लाडकी योजनेमध्ये 1 लाख 1 हजार रुपये कसे दिले जाणार ?

  • लेक लाडकी योजनेमध्ये मुलीच्या जन्मानंतर 5 हजार रुपये दिले जातील.
  • या योजनेतील दुसरी रक्कम ही मुलगी पहिलीच्या वर्गात गेल्यावर 6 हजार रुपये मिळणार आहे.
  • मुलगी सहावीत गेल्यावर तिसरी रक्कम 7 हजार रुपये दिली जाईल.
  • मुलगीचे 11 वीच्या वर्गात प्रवेश घेतल्यानंतर आठ हजार रुपये दिले जातील.
  • लेक लाडकी योजनेमध्ये शेवटची म्हणजे पाचवी रक्कम मुलगी 18 वर्षांची झाल्यावर दिली जाणार आहे. अश्या प्रकारे 5 टप्प्यात लेक लाडकी योजनेची रक्कम मिळणार आहे.

लेक लाडकी योजनेसाठी कोणकोणती कागदपत्रे आवश्यक आहे?

  1. लेक लाडकी योजनेचा फायदा घेण्यासाठी तुमच्याकडे पांढरे किंवा केसरी रेशन कार्ड असणे आवश्यक आहे तरच तुम्हाला या योजनेचा लाभ घेता येईल.
  2. मुलीच्या आई-वडिलांकडे आधारकार्ड असणे गरजेचे आहे.
  3. आई- वडिलांसोबत मुलीचा फोटो असावा.
    या योजनेसाठी अर्ज करणाऱ्या आई-वडिलांचा पासपोर्ट साईझ फोटो लागणार आहे.
  4. तुम्हाला उत्पनाचा दाखला, रहिवाशी दाखला, मोबाईल नंबर, ई-मेल आयडी, बँक पासबुकची झेरॉक्स, मुलीचा जन्म दाखला इत्यादी लागणार आहे.
  5. वरील सर्व कागदपत्रे लागणार आहे तेव्हा तुम्ही लेक लाडकी योजनेसाठी अर्ज करू शकता.
  6. त्याच बरोबर मुलीच्या आई किंवा वडिलांकडे बचत खाते आवश्यक आहे ज्यामध्ये 5 हप्त्यात ही रक्कम येईल.

लेक लाडकी योजना अटी / नियम मराठीत

  • लेक लाडकी योजनेचा लाभ घेण्यासाठी दुसऱ्या अपत्यानंतर आई- वडिलांना नसबंदी (कुटुंब नियोजन) ऑपरेशन करावे लागणार आहे.
  • मुलीच्या आई किंवा वडिलांकडे एक बचत खाते असणे अनिवार्य आहे.
  • मुलीच्या जन्मानंतर लेक लाडकी योजनेसाठी अर्ज करणे आवश्यक आहे.
  • या योजनेचा लाभ 1 एप्रिल 2023 च्या नंतर जन्म घेतलेल्या मुलींना घेता येणार आहे.
  • 1 लाख 1 हजार रुपये मुलीच्या आई-वडिलांचे जे जॉइंट अकाउंट असेल त्यातच मिळणार आहे हे लक्षात घ्या.

लेक लाडकी योजनेसाठी अर्ज कसा करावा? / lek ladki yojana 2024 online apply in marathi.

  1. आंगणवाडी सेविकाकडे आम्ही खालील दिलेला फॉर्म तुम्ही झेरॉक्स काढून तुम्ही अंगणवाडी सेविकांकडे सर्व आवश्यक कागदपत्रे जोडून द्यावा.
  2. अंगणवाडी सेविका / पर्यवेक्षक तुमची माहिती घेऊन ऑनलाईन फॉर्म भरून देतील व त्यानंतर तुमच्या अर्जाची पडताळणी होऊन तुम्हाला या योजनेचा लाभ मिळेल.

📥 लेक लाडकी योजना फॉर्म

इकडे लक्ष द्या.

लेक लाडकी योजनेसाठी तुमचे राशन कार्ड असणे आवश्यक आहे त्यामुळे लवकरच तुमच्या जवळच्या CSC सेंटरवर जाऊन तुमचे राशन कार्ड काढून घ्या. लेक लाडकी योजनेमुळे मुलींच्या जन्मदरात वाढ व्हावी तसेच मुलींना शिक्षणाप्रती जागृत करणे, भ्रूणहत्या थांबवणे, मुलींचे कुपोषण थांबवणे इत्यादी कारणासाठी लेक लाडकी योजना महाराष्ट्र सरकारद्वारे राबवण्यात येणार आहे.

1 thought on “लेक लाडकी योजना 2024 : मुलींना मिळणार 1 लाख 1 हजार रुपये आजच करा अर्ज ..!”

Leave a Comment