बँकिंग आणि फायनान्स: बँक कलेक्शन विभागात नोकरी कशी मिळवावी?

बँकिंग आणि फायनान्समध्ये कर्ज वसुलीची नोकरी मिळवण्याचे मार्ग / बँक कलेक्शन विभागात करिअर कसे घडवावे?

बँक कलेक्शन विभागात नोकरी कशी मिळवावी?

नमस्कार मित्रांनो, तुमच्या दैनंदिन जीवनात तुमच्या लक्षात आले आहे का, की क्रेडिट कार्ड वापरकर्त्यांची संख्या खूप वेगाने वाढत आहे. कर्ज घेणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे हेही तुमच्या लक्षात आले असेल. हा एक मोठा inside आहे जो तुम्हाला या क्षेत्रात करिअरची चांगली संधी मिळवून देऊ शकतो. भारताचे तारण कर्ज आणि क्रेडिट कार्ड बाजार खूप वेगाने वाढत आहे. अहवालानुसार त्याचा विकास दर 10% पेक्षा जास्त आहे आणि भारतातील NPA दर 9.9% आहे. NPA म्हणजेच नॉन-परफॉर्मिंग मालमत्ता हे बँकेच्या तोट्याचे प्रमुख कारण आहे आणि कोणत्याही कंपनीला कोणत्याही बँकेला लॉस नको असतो.

मग हे नुकसान कमी करण्यासाठी बँका काय करतात? कलेक्शन प्रोफेशनल्सला बँका कामावर ठेवतात. हा बँका आणि वित्तपुरवठा करणाऱ्या कंपन्यांमधील एक समर्पित विभाग आहे, ज्याच्या मदतीने दिलेले कर्ज रक्कम वसूल केली जाते. बँकिंग आणि फायनान्समध्ये तुमचे करिअर घडवायचे असेल तर कलेक्शन डिपार्टमेंट ही एक अतिशय महत्त्वाची करिअरची संधी बनु शकते. आजच्या पोस्टमध्ये, आपण बँकिंग क्षेत्रात कलेक्शन विभागात आपले करियर कसे बनवू शकता आणि आपले बँकिंग करिअर कसे सुरू करू शकता हे आपण जाणून घेणार आहोत.

कलेक्शन विभाग म्हणजे काय आणि कलेक्शन प्रोफेशनल म्हणून तुमच्या जबाबदाऱ्या काय आहेत?

सोप्या भाषेत बोलायचे झाले तर,कलेक्शन विभाग नावातूनच समजते की बँकेने दिलेल्या कर्जाची वसुली करणे ही त्यांची जबाबदारी असते. बँकेच्या कर्जाची कलेक्शन प्रक्रिया ही धमक्या देऊन होत नाही, ती व्यावसायिक पद्धतीने करावी लागते.

कलेक्शन डिपार्टमेंटचे मुख्यतः काम असते की थकीत खात्यांचा पाठपुरावा करणे, ग्राहकांना त्यांच्या कर्जाची पुर्तता करण्यात मदत करणे आणि बँकेचा तोटा कमीत कमी करण्याचे प्रयत्न करणे हे या विभागाचे मूळ काम आहे.

बँकेत कलेक्शन अधिकाऱ्यांना काय कामे असतात?

बँकेत कलेक्शन प्रोफेशनल म्हणून तुमचे काम असेल की ग्राहकांसोबत कम्युनिकेट करणे, त्यांच्यासोबत नेगोशिएट करणे, त्यांचे प्रॉब्लेम सोडवणे, एका कॉमन एग्रीमेंटवर येऊन ग्राहकांकडून लोन वसूल करून घेणे , बँकेचे लॉस कमीत कमी होण्यासाठी प्रयत्न करणे इत्यादी.

बँकेत कलेक्शन डिपार्टमेंटमध्ये जॉब मिळवण्यासाठी काय पात्रता हवी आणि काय स्किल्स पाहिजेत?

बँकेत कलेक्शन डिपार्टमेंटमध्ये जॉबच्या पात्रतेसाठी तुमच्याकडे एक बॅचलर डिग्री असणे आवश्यक आहे.
जर तुमच्याकडे फायनान्स अकाउंटिंगशी रिलेटेड कोणती डिग्री असेल तर तुम्हाला काम मिळवणे सोपे होईल.
तुम्ही एमबीए केले असले तरीही तुम्ही या जॉबसाठी पात्र आहात पण एमबीए करणे अनिवार्य नाही.

आवश्यक कौशल्ये / Skills

  • तुमची संभाषण कौशल्ये खूप स्ट्रॉंग असले पाहिजे आणि त्याहून अधिक कोणती स्किल असली पाहिजे तर ती तुमची वाटाघाटी शक्ती (negotiation) आहे, कारण त्यामुळे तुम्ही गुंतागुंतीची प्रकरणे सोडवू शकाल.
  • येथे तुम्हाला mutual एग्रीमेंट करावी लागेल त्यामुळे तुमचे वाटाघाटीचे कौशल्य चांगले असले पाहिजे.
  • जरी फ्रेशर्स देखील या नोकरीसाठी पात्र असले, परंतु जर तुम्हाला विक्री (Sales), ग्राहक सेवा (Customer Service) किंवा रिकवरीचा अनुभव असेल तर तुमच्यासाठी नोकरी मिळवणे खूप सोपे होईल.
  • जर आपण विशेष कौशल्यांबद्दल पाहिले, तर कम्युनिकेशन आणि वाटाघाटी (नेगोशिएशन) कौशल्ये असणे आवश्यक आहे, याशिवाय तुमच्यात सहानुभूती (Empathy) आणि संयम असणे आवश्यक आहे.
  • सहानुभूतीचा (Empathy) अर्थ असा आहे की तुम्ही इतरांची परिस्थिती समजून घेऊन तुम्ही संयमाने सामायिक निर्णयावर येऊ शकता. ज्यामध्ये तुम्ही ग्राहकांना व्यावसायिकपणे हाताळाल आणि कठोर व्हाल परंतु त्याच वेळी तुम्हाला त्यांची परिस्थिती देखील समजावी लागेल, कारण तुम्ही त्यांच्यावर खूप दबाव टाकला आणि जर कोणी चुकीचे पाऊल उचलले तर त्याची जबाबदारी बँकेची असेल म्हणूनच तुम्हाला धीर धरावा लागेल आणि त्याच वेळी रिकवरी करावी लागेल.
  • एक कौशल्य तुम्हाला खूप आवश्यक असेल ते म्हणजे फाइनेंशियल डेटाचे विश्लेषण करणे.
    तुमच्याकडे मूलभूत फाइनेंशियल साक्षरता असली पाहिजे तरच तुम्ही या भूमिकेसाठी योग्य उमेदवार असाल.

बँकेत कलेक्शन विभागात जॉब कसा मिळवावा?

1) सर्वप्रथम तुम्हाला तुमचा रेझ्युमे तयार करावा लागेल जो या विभागासाठी योग्य आणि संबंधित असणार आहे.
2) तुम्हाला बँकांच्या वेबसाइट्स नियमितपणे तपासत राहाव्या लागतील आणि तुमच्या समोर आलेल्या संधींमध्ये अर्ज करत राहावा लागेल.
3) केवळ बँकेच्या वेबसाईट नाही तर nukri.com, foundit, indeed, glassdoor सारख्या विविध जॉब पोर्टलवर उपलब्ध असलेल्या संधींसाठीही तुम्हाला नियमितपणे अर्ज करावा लागेल.
4) नेटवर्किंग रेफरेंस घेणे खूप फायदेशीर ठरू शकते. तुम्ही बँकेच्या शाखांमध्ये जाऊ शकता आणि जे लोक आधीच कर्ज विभागात काम करत आहेत त्यांच्यापर्यंत तुम्ही जॉब शोधत आहात आणि तुमचे काय शिक्षण झाले आहे सांगू शकता.

मुलाखतीची तयारी
  • तुम्ही मुलाखत क्लिअर केल्याशिवाय तुम्हाला नोकरी मिळणार नाही, त्यामुळे सगळ्या प्रोसेसमध्ये मुलाखत खूप महत्वाची असणार आहे.
  • मुलाखतीच्या तयारीसाठी काही सामान्य प्रश्न आहेत जे प्रत्येक वेळी विचारले जातात त्या सामान्य प्रश्नांची तयारी करा आणि चांगले कपडे घालून जा.
  • तुमच्या देहबोलीत (in body language) आत्मविश्वास ठेवा, तुमची संभाषण कौशल्ये वापरा आणि तुमची काम करण्याची इच्छा शक्ती दाखवा.
  • तुम्ही या प्रोफाइलसाठी योग्य उमेदवार आहात हे सिद्ध करा, हे सर्व तुम्हाला मुलाखत क्रॅक करण्यात खूप मदत करेल.

Final Word :-

मला आशा आहे की या पोस्टमुळे तुम्हाला फायनान्स बँकेत कलेक्शन विभाग काय आहे, हे एक चांगले करियर का आहे, तुम्ही त्यात तुमचे करिअर कसे बनवू शकता,याविषयी माहिती आवडली असेल. जर तुम्हाला ही पोस्ट आवडली असेल तर तुमच्या मित्रांसह नक्की शेअर करा.

Leave a Comment