बँक इंटरव्यू प्रश्न-उत्तरे ,Bank Interview Questions and Answers In Marathi.

Bank Interview Questions and Answers In Marathi

जर तुम्हाला ॲक्सिस बँक, आयसीसी बँक, कोटक महिंद्रा बँक, जना बँक अश्या खाजगी बँकांमध्ये काम करायचे असेल तर ही पोस्ट तुमच्यासाठी खूप उपयुक्त ठरणार आहे. या पोस्टमध्ये, मी तुम्हाला असे 9 प्रश्न शेअर करणार आहे जे बहुतेक प्रत्येक खाजगी बँकेच्या मुलाखतीत विचारले जातात. हे प्रश्न विशेषतः फ्रेशर्ससाठी खूप उपयुक्त ठरणार आहेत. जर तुम्हाला एखाद्या खाजगी बँकेत फ्रेशर म्हणून अर्ज करायचा असेल तर ही पोस्ट सुरुवातीपासून शेवटपर्यंत नक्की वाचा कारण हे सर्व प्रश्न आणि त्यांची उत्तरे कशी द्यायची हे मी तुमच्याशी शेअर केले आहे.

खाजगी बँकेत मुलाखतीत विचारले जाणरे प्रश्न व त्याची उत्तरे / Bank Interview Questions and Answers In Marathi.

1) प्रत्येक बँकेत विचारला जाणारा पहिला प्रश्न म्हणजे तुमच्याबद्दल काही सांगा?

हा प्रश्न दोन-तीन प्रकारे विचारला जाऊ शकतो, जसे की तुमच्याबद्दल थोडक्यात सांगा आणि तुमची ओळख करून द्या. जर तुम्ही हुशारीने या प्रश्नाचे उत्तर दिले तर तुम्ही मुलाखत घेणाऱ्या व्यक्तीला चांगल्या प्रकारे इम्प्रेस करू शकता.

या प्रश्नाचे उत्तर देताना तुम्हाला स्वतःबद्दल तुमची ताकद सांगायची आहे आणि तुम्ही बँकिंग क्षेत्रासाठी एक योग्य उमेदवार आहात हे देखील सिद्ध करायचे आहे.

2. तुम्हाला बँकिंग क्षेत्रात करिअर करावे असे का वाटत आहे?

बघा, भारतात नोकरीच्या अनेक संधी आहेत, वेगवेगळे उद्योग आहेत, तुम्हाला बँकिंग क्षेत्रात का यायचे आहे याचे विशेष उत्तर द्यावे लागेल. बँकिंग उद्योगात काम करण्याचे काय फायदे आहेत ते तुम्हाला सांगावे लागतील. जसे की बँकिंग क्षेत्र वेगाने वाढणारी इंडस्ट्री आहे, वेतन चांगले आहेत, जॉबमध्ये स्थैर्य आहे, वाढीच्या संधी चांगल्या आहेत आणि तुम्ही या क्षेत्रात काम केल्यास तुमची शैक्षणिक पार्श्वभूमी खूप मदत करेल असे तुम्हाला उत्तर द्याचे आहे.

3. बँकिंगमधील कोणती उत्पादने (प्रॉडक्ट्स) तुम्हाला माहीत आहेत?

या प्रश्नाच्या उत्तरात तुम्हाला सांगावे लागेल की विविध बँकिंग उत्पादने आहेत जसे की खाती, कार्ड, कर्ज, विमा इ. तुम्ही या प्रश्नाचे उत्तर नीट तयार करून जा.

तुम्हाला पुढील फॉलो प्रश्न विचारला जाईल की तुम्हाला यापैकी कोणत्या विभागात काम करायचे आहे?

या प्रश्नाचे उत्तर म्हणजे तुम्हाला बँकेत काम करण्यासाठी कोणत्या विभागात जास्त रस आहे हे तुम्हाला द्यायचे आहे. तुम्हाला विम्यात जास्त रस आहे, कर्जात जास्त रस आहे की इतर सेवा उत्पादनांमध्ये जास्त रस आहे, हे जाणून घ्या आणि मग तुम्हाला त्या तयारीने प्रश्नांची उत्तरे तयार करून जायचे आहे.

4. बँकिंग क्षेत्राशी संबंधित तुमचे ज्ञान चेक करण्यासाठी काही प्रश्न विचारले जातील.

यामध्ये तुम्हाला खालील प्रश्न विचारले जाऊ शकतात

  • जसे रेपो दर म्हणजे काय?
  • मालमत्ता (ॲसेट) म्हणजे काय?
  • दायित्व (लायबिलिटी) म्हणजे काय?

असेच काही मूलभूत आर्थिक आणि बँकिंग संबंधित प्रश्न तुमच्याकडून विचारले जाऊ शकतात. यासाठी तुम्हाला योग्य तयारी करावी लागेल.

5) पुढील प्रश्न: तुम्ही सेल्समध्ये जात असाल, तर तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो तो म्हणजे या शहरातील काही प्रसिद्ध ठिकाणांबद्दल सांगा?

  • हा प्रश्न विचारला जातो जेणेकरून तुम्ही जेव्हा मार्केटिंगसाठी फिल्डवर जाता, तेव्हा तुम्हाला शहरांतील सर्व ठिकाणांची माहिती असणे अत्यंत आवश्यक असते.
  • त्यामुळे जर तुम्हाला शहरातील मुख्य ठिकाणे माहीत असतील तर तुम्ही ग्राहकांपर्यंत सहज पोहोचू शकाल याची त्यांना कल्पना येते.
  • तुम्हाला तुमच्या कामाच्या परिसराची चांगली माहिती असल्यास, तुमच्यासाठी विक्री (सेल्स) करणे आणि दिलेल्या सूचनांचे पालन करणे खूप सोपे होईल.

6. तुम्ही बँकिंग प्रॉडक्ट कसे सेल करणार आहेत?

या उत्तर तुम्हाला अतिशय हुशारीने द्यावे लागेल. तुम्हाला असे म्हणायचे आहे की मी कोणती रँडम प्रॉडक्ट ग्राहकाला विकणार नाही, आधी मी समजून घेईन की त्या ग्राहकाची गरज काय आहे? आणि त्यानुसार त्यांच्यासाठी विशिष्ट प्रॉडक्ट काय असेल आणि ते खरेदी केल्यानंतर ग्राहकाचे फायदे काय असतील हे मी पाहीन.
त्यामुळे हे सर्व आर्थिक विश्लेषण करून आणि ग्राहकाची प्रोफाइल पहिल्यानंतरच मी योग्य प्रोडक्ट त्यांना पिच करेन.
ज्यामुळे मला त्वरित विश्वास निर्माण करण्यास मदत होईल आणि मी प्रॉडक्ट विकू शकेन.

तर, जर तुम्ही या प्रश्नाचे उत्तर चांगले दिले असेल, तर तुम्ही बाकीचे उत्तरे कमी-चांगली दिली असतील, तरी तुमची निवड होण्याची शक्यता खूप जास्त असेल, कारण प्रत्येक बँकेत बहुतेक प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षपणे काम हे विक्रीशी (sales) संबंधित असते.

7) 5-10 वर्षांनंतर तुम्ही स्वतःला कुठे पाहता?

हा प्रश्न विचारण्याचा उद्देश हा आहे की तुम्ही या क्षेत्रात तात्पुरते येत तर नाही आहात हे समजून घेणे. तुम्ही तात्पुरते बँकिंगमध्ये तर येत नाही ना ? तुम्ही स्वतःला दीर्घकालीन बँकिंगमध्ये पाहता का? अशा प्रश्नामधून कळते तुम्ही जॉबमध्ये स्थिर राहाल किंवा लवकरच निघून जाल याची कल्पना मिळते.

म्हणून या प्रश्नाचे उत्तर हुशारीने तयार करा आणि उत्तर द्या की दीर्घ काळानंतर बँकिंग क्षेत्रात मी स्वतःला मोठया प्रोफाइलवर पाहतो.

8. जेव्हा एखादा ग्राहक तुमच्यावर ओरडतो तेव्हा तुमची प्रतिक्रिया कशी असेल?

हा प्रश्न विचारण्याचा उद्देश म्हणजे तुमचे व्यक्तिमत्व समजून घेणे आणि तुम्ही बँकिंगसाठी योग्य आहात की नाही हे समजून घेणे, कारण बँकिंग हा सेवा उद्योग आहे आणि या सेवा उद्योगात सर्वांना आनंदी ठेवणे सोपे काम नाही.

ग्राहकांना राग येण्याची अनेक वेळा अशी परिस्थिती निर्माण होते, यात ग्राहकाची चूक किंवा बँकेची चूक असू शकते, परंतु अशा वेळी बँक प्रतिनिधींना ग्राहकांना अतिशय संयमाने हाताळावे लागते.

तुम्हाला राग आला तरी फक्त रागावर नियंत्रण ठेवून ग्राहकाला हाताळायचे आहे. जर तुम्हाला ती परिस्थिती हाताळायची असेल तर तुम्ही तुमचे उत्तर त्याच पद्धतीने तयार कराल की “जर ग्राहक माझ्यावर ओरडत असेल तर आधी मी त्याचे ऐकून घेईल की त्याला काय प्रॉब्लेम आहे? मी त्याला शांत करण्याचा प्रयत्न करेन आणि नंतर बँकिंग धोरणानुसार त्याला सोलुशन देईन.

तुम्ही अशाप्रकारे उत्तर दिल्यास, तुम्ही बँक आणि ग्राहक या दोन्ही गोष्टींचा समतोल साधत आहात, त्यामुळे तुम्हाला या प्रश्नाचे उत्तर अश्या प्रकारे द्यावे लागेल.

9. आम्ही तुम्हाला कामावर का घ्यावे?

जर तुम्ही आत्तापर्यंत प्रश्नांची उत्तरे दिली असतील तर हा प्रश्न तुम्हाला विचारला जाईल. या प्रश्नाचे उत्तर देताना तुम्हाला तुमची स्किल्स सांगावी लागतील. तुम्ही बँकिंग उद्योगासाठी योग्य का आहात?, तुम्हाला या उद्योगात का काम करायचे आहे? आणि त्यांनी तुम्हाला तिथे काम करण्याची संधी का द्यायची याचे वैयक्तिक कारणही तुम्ही देऊ शकता.

जर तुम्ही या प्रश्नाचे उत्तर नीट दिले तर सिलेक्शनच्या दिशेने तुमचे हे अंतिम पाऊल असेल.

Final word :-

मित्रांनो,मला आशा आहे की तुम्हाला हे आजच्या पोस्टमधील मुलाखतीचे प्रश्न व त्याची उत्तरे सहज समजले असतील.

त्यामुळे मला आशा आहे की या पोस्टने तुम्हाला मदत केली असेल, बँक मुलाखतीची तयारी करणाऱ्या तुमच्या मित्रांसह ही पोस्ट शेअर करा.

पोस्ट पूर्ण वाचल्याबद्दल धन्यवाद.

Leave a Comment