माझे कुटुंब निबंध मराठी | Majhe Kutumb Nibandh Marathi.

1) माझे कुटुंब निबंध मराठी / Essay on my family in marathi.

माझा परिवार खूपच छोटा आहे. आम्ही घरात पाच जण राहतो, माझी आई, बाबा, मोठा भाऊ आणि आजी. माझा भाऊ माझ्याहून दोन वर्षांनी मोठा आहे. आम्ही दोघे एकाच शाळेत शिकतो; तो आठवीत आणि मी सहावीत आहे. आमची शाळा घराच्या फार जवळ असल्यामुळे आम्ही चालतच शाळेत जातो.

माझे बाबा —- कार्यालयात काम करतात, तर आई गृहिणी आहे. घरात आजी एकटी असते, पण ती अजूनही स्वतःचे काम स्वतः करते. संध्याकाळी आम्ही सर्वजण एकत्र फिरायला जातो, आणि आई-बाबा आमच्यासोबत बॅडमिंटन खेळतात. त्याशिवाय, ते आम्हाला हास्यप्रद किस्से व कविता सांगतात.

आमच्या घराचे वातावरण शांत आहे; कोणीही एकमेकांशी भांडत नाही. घरातील समस्या सर्वजण मिळून सोडवतात. घरात आजीच्या मताला विशेष महत्त्व आहे आणि तिचे सर्वजण मान ठेवतात. शाळेला सुट्टी मिळाल्यावर बाबा आम्हाला बाहेर फिरायला नेतात. सणासुदीला नवे कपडे घेतात, आणि आई घरीच स्वादिष्ट पदार्थ बनवते. आमच्या घरी नातेवाईकांचाही सतत येणं-जाणं असतं.

2) माझे कुटुंब दहा ओळीतील निबंध / My family essay in marathi 10 lines.

1. माझं नाव — आहे आणि माझ्या परिवारात — सदस्य आहेत.
2. माझ्या परिवारात आजोबा, आजी, आई, बाबा आणि आम्ही दोन भावंडं आहोत.
3. आजोबा आणि आजी आमच्या कुटुंबातील ज्येष्ठ आणि आदरणीय व्यक्ती आहेत.
4. माझे बाबा शिक्षक आहेत आणि ते मला नेहमी शिक्षणाचं महत्त्व सांगतात.
5. माझी आई गृहिणी आहे आणि ती घरातील सर्वांची काळजी घेते.
6. आमच्या परिवारातील प्रत्येक सदस्य एकमेकांवर प्रेम करतो आणि एकत्र राहत असतो.
7. आमचा परिवार नेहमी एकत्र जेवतो, ज्यामुळे आमच्यातील आपुलकी वाढते.
8. आमच्या घरात शिस्त आणि सभ्यता यांना महत्त्व दिलं जातं.
9. आमचा परिवार एक आदर्श आणि आनंदी परिवार आहे.
10. मला माझा परिवार खूप प्रिय आहे, कारण तो मला नेहमी मार्गदर्शन आणि आधार देतो.

3) माझा परिवार निबंध मराठी / Maze Kutumb Nibandh Marathi.

परिवार हे प्रत्येकाच्या आयुष्याचा एक महत्त्वाचा भाग असतो. माझा परिवार एक छोटा आणि आनंदी परिवार आहे. आमच्या घरात माझे आई-वडील, आजोबा, आजी, माझा एक भाऊ, एक बहीण, आणि मी राहतो. प्रत्येकाचे आपले स्वतःचे गुण आहेत, ज्यामुळे आमच्या घराला एक खास ओळख मिळते.

माझे आजोबा आणि आजी

माझे आजोबा एक निवृत्त सरकारी कर्मचारी आहेत आणि ते शिस्तप्रिय आणि कर्तव्यनिष्ठ व्यक्ती आहेत. ते आम्हाला सदैव चांगल्या वर्तणुकीचे धडे देतात आणि आयुष्यात मेहनत करण्याचे महत्व शिकवतात. माझी आजी एक सुसंस्कृत आणि स्नेहळ स्त्री आहे. ती आम्हाला शाळेसाठी तयार होण्यासाठी मदत करते आणि घर नेहमी स्वच्छ ठेवते.

माझे वडील

माझे वडील उच्च शिक्षित आहेत आणि एका आंतरराष्ट्रीय कंपनीत मुख्य मार्केटिंग अधिकारी म्हणून काम करतात. त्यांचे काम बऱ्याच वेळा बाहेरच असते, पण घरी आले की ते आमच्यासोबत वेळ घालवतात. ते नेहमी नवीन गोष्टी शिकवतात आणि वेगवेगळ्या ठिकाणांहून आमच्यासाठी आवर्जून छान भेटवस्तू आणतात.

माझी आई

माझी आई खूप प्रेमळ आणि कर्तव्यदक्ष गृहिणी आहे. ती जास्त शिकलेली नाही ती घरात राहूनच आमच्यासाठी सर्व काही करते. ती नेहमी आम्हाला अभ्यास करून चांगले मोठे व्हा सांगत असते, आणि आम्हाला छान छान पदार्थ बनवून देण्यासाठी स्वयंपाक घरात काम करते. आई घरातील सर्व कामांची काळजी घेत असल्याने आमचे सुखी आणि आनंदी आहे.

माझी छोटी बहीण

माझी छोटी बहीण सहावीत शिकत असून अभ्यासात अतिशय हुशार आहे. ती नेहमी चांगल्या गुणांनी पास होते आणि सर्व शिक्षक तिच्या सांस्कृतिक गुणांचे कौतुक करतात. तिला नाचण्याचा विशेष छंद आहे आणि ती इतर सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये आवर्जून उत्साहाने भाग घेते.

मी आणि माझे घरातील स्थान

मी घरातील एकुलता एक मुलगा आहे. माझ्या घरच्यांचा माझ्यावर खूप जीव आहे. माझे कुटुंब मला “भैय्या” या टोपणनावाने हाक मारतात, ज्यामुळे घरात एक आपलेपणाची भावना निर्माण होते. मला माझ्या कुटुंबाच्या सर्व स्वप्ने पूर्ण करायच्या आहेत आणि त्यांचे नाव मोठे करण्याची इच्छा आहे.

निष्कर्ष

माझा परिवार हा एक सुखी आणि एकमेकांना आधार देणारा परिवार आहे. आम्ही सर्वजण एकमेकांच्या सुख-दुःखात सहभागी होतो आणि एकत्रितपणे जीवनाचा आनंद घेऊन जगत आहोत.

Leave a Comment