माझे बाबा निबंध मराठी / Maze Baba Essay In Marathi.
माझे बाबा माझ्या जीवनातील सर्वात मोठी प्रेरणा आहेत. ते खूपच दयाळू आणि मेहनती व्यक्ती आहेत, आणि आमच्या कुटुंबाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी सतत काम करत असतात. माझ्या बाबांचे नाव —– आहे, आणि ते मराठा मंदिर शाळेत शिक्षक पदावर काम करतात. त्यांच्या आवडीचा पदार्थ बासुंदी आहे, आणि त्यांना सर्वांशी नम्रतेने बोलण्याची सवय आहे.
बाबा मला अभ्यासात मदत करण्यासाठी माझ्या सर्व विषयांचा अभ्यास घेतात आणि माझ्यासोबत अभ्यास पूर्ण झाल्यावर खेळतातही. ते खूप दयाळू आहेत ते नेहमीच गरजूंना मदत करत असतात. बाबांचे वय ४५ वर्षे असून, ते दररोज माझ्यासोबत शाळेला येतात. बाबा मला नेहमीच नवनवीन गोष्टी शिकण्यासाठी प्रेरणा देतात. त्यांना पांढऱ्या रंगाचे कपडे घालायला खूप आवडतात, आणि बाबा दररोज सकाळी पहाटे पाच वाजता लवकर उठतात.
माझे बाबा माझ्या आजी- आजोबांचे आदर्श मुलगा आणि माझ्यासाठी एक महान बाबा आहेत. बाबांना उत्तम प्रकारे स्वयंपाक बनवता येतो ; ते अतिशय स्वादिष्ट पदार्थ बनवतात. मला नेहमीच त्यांच्या प्रेमाचा आणि आधाराचा अनुभव येतो. खरंच, माझे बाबा माझे “सुपरहीरो” आहेत. ते आमच्या घराचे आधारस्तंभ आणि माझे सर्वात चांगले मित्र आहेत.
माझे बाबा निबंध 10 ओळीत / Maze Baba Nibandh In Marathi 10 lines.
1. माझ्या वडिलांचे नाव रमेश आहे.
2. ते खूप शांत आणि विनम्र स्वभावाचे आहेत.
3. माझे बाबा शेतकरी आहेत आणि ते शेतात काम करून धान्य पिकवतात.
4. आमच्या कुटुंबाचे ते एक आधारस्तंभ आहेत.
5. ते नेहमी आम्हाला शिस्तबद्ध राहण्याची शिकवण देतात.
6. दर संध्याकाळी ते मला आमच्या घराजवळ राणीच्या बागेत फिरायला घेऊन जातात.
7. बाब माझ्या अभ्यासात मला मदत करतात.
8. मला कोणतीही समस्या असेल तर ते मला नेहमीच मदत करतात.
9. बाबा मला नेहमी चांगल्या व वाईट गोष्टींबद्दल शिकवण देतात.
10. मी माझ्या बाबांवर खूप प्रेम करतो आणि मला ते माझे बाबा असल्याचा अभिमान आहे.
माझे बाबा निबंध मराठी / My Father Essay In Marathi Language.
माझे बाबा माझ्या जीवनात मुख्यस्थानी आहेत, आणि मी त्यांच्यावर खूप प्रेम करतो. ते माझे सर्वात जवळचे मित्र आहेत आणि मला सतत नवीन गोष्टी शिकवतात. माझ्या बाबांचे नाव गंगाराम आहे, त्यांचे वय ४२ वर्षे आहे आणि ते कंपनीत काम करतात. ते सकाळी ९ वाजता कंपनीत जातात आणि संध्याकाळी ६ वाजता घरी येतात.
संध्याकाळी घरी आल्यावर बाबा माझ्या अभ्यासात मला मदत करतात. त्यांची इंग्रजी भाषा खूप चांगली आहे, ते मला इंग्रजी दररोज शिकवतात. माझे बाबा हसमुख स्वभावाचे व चांगल्या व्यक्तिमत्त्वाचे आहेत. ते सर्वांचा आदर करतात आणि गरजू लोकांना मदतीचा नेहमी हात देत असतात.
बाबा आमच्या कुटुंबाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी नेहमी काम करत असतात. मी काही चुका केल्यास ते मला प्रेमाने समजावून सांगतात. सुट्टीच्या दिवशी ते मला गडकिल्ले पाहायला फिरायला घेऊन जातात, जिथे आम्ही एकत्र मज्जा करतो आणि आनंद घेतो.
माझे बाबा एक चांगले खेळाडू देखील आहेत. कधीकधी ते माझ्यासोबत क्रिकेट,फुटबॉलसारखे खेळ खेळतात, ज्यामुळे माझा आनंद द्विगुणित होतो. मला माझ्या बाबांचा खूप आदर आहे, मी त्यांचावर खूप प्रेम करतो.
माझे वडील निबंध मराठी / Maze Vadil Nibandh In Marathi.
प्रस्तावना
माझ्या जीवनात माझे बाबा म्हणजे माझे संपूर्ण जग आहेत. ते माझ्या सर्व प्रेरणेचे,ऊर्जेचे स्रोत आहे, त्यांच्या मार्गदर्शनावर मी माझे जीवन घडवणार आहे. माझे बाबा म्हणजे माझे खरे मित्र, मार्गदर्शक, आणि एक आदर्श व्यक्तिमत्व आहेत.
बाबांचा परिचय
माझ्या बाबांचे नाव अजित पाटील आहे. ते अत्यंत मेहनती, शांत आणि प्रेमळ व्यक्ती आहेत. बाबांची तब्येत त्यांच्यावरच्या मेहनत दाखवते, आणि ते दररोज सकाळी लवकर उठून व्यायाम करतात आणि माझ्याकडून देखील करून घेतात.
बाबांची दिनचर्या
माझे बाबा दररोज सकाळी लवकर उठून व्यायाम केल्यावर ते मंदिरात देवाची पूजा करतात. त्यानंतर नाष्टा करून आवरून ते त्यांच्या कामाला जातात. दिवसभर काम करून संध्याकाळी परतल्यावरही ते आम्हाला खूप वेळ देतात. त्यांच्या वेळेचे नियोजन फार छान आहे,त्यावरून मला वेळेचे महत्त्व समजले आहे.
शिक्षणात मदत
शाळेच्या अभ्यासात आई तर मदत करते परंतु बाबांची मदत अनमोल आहे. गणित असो किंवा विज्ञान, बाबांची शिकवण्याची पद्धत मला फार सोपी वाटते. ते दररोज अभ्यास करण्याचा सल्ला देतात, ज्यामुळे मी माझ्या शैक्षणिक यशात सातत्याने प्रगती करत आहे.
कुटुंबाचा आधार
माझे बाबा आमच्या कुटुंबाचा प्रमुख आधार आहेत. ते माझ्या आईचा नेहमीच सन्मान करतात, आणि त्यांना आवश्यक असताना घरातील दुसऱ्या कामात मदत करतात. त्यांच्या या गुणांमुळे आमच्यामध्ये एकमेकांना मदत करण्याची भावना आणि एक कौटुंबिक भावना निर्माण होते.
बाबांचे मूल्य आणि शिकवण
माझे बाबा मला नेहमी सत्याच्या मार्गावर चालण्याची शिकवण देतात. त्यांनी मला वडीलधाऱ्या- मोठ्या माणसांचा आदर करायला शिकवलं आहे. ते मला नेहमी सांगतात की प्रत्येक सेकंदाचे महत्त्व आहे व त्याचा योग्य वापर केला पाहिजे.
निष्कर्ष
माझ्या बाबांमुळेच माझ्या जीवनात अनुशासन, आदर आणि मेहनत या गोष्टी रुजल्या आहेत. ते माझ्या जीवनातील खरे शिल्पकार आहेत. मी माझ्या बाबांचा प्रचंड आदर करतो आणि त्यांच्यावर मनापासून खूप खूप प्रेम करतो.
माझे बाबा निबंध मराठी / Maze Baba Nibandh In Marathi 500 words.
माझ्या मनात बाबांचा आदर आणि प्रेम
मी मानतो की,माझे बाबा जगातील सर्वात चांगले आणि प्रेमळ बाबा आहेत. त्यांचे नाव —–आहे.( येथे आपल्या बाबांचे नाव लिहा.) माझे बाबा एक यशस्वी व्यापारी आहेत. ते वेळ पाळण्यासाठी मानले जातात आणि आपल्या कामात नेहमी प्रामाणिकपणे व मेहनतीने करण्यासाठी ओळखले जातात. त्यांच्या विनम्र आणि शांत स्वभावामुळे आमच्या घराजवळील लोक व आमचे सर्व नातेवाईक त्यांचा आदर करतात.
बाबांवर कुटुंबाची जबाबदारी
बाबा आमच्या संपूर्ण कुटुंबाच्या सर्व इच्छा व गरजा पूर्ण करण्यासाठी खूप जास्त मेहनत घेतात. आई, आजी-आजोबा, भावंडे, आणि मला ,आम्हाला कोणत्याही गोष्टीची कोणती कमी पडू नये याची ते काळजी घेतात
प्रोत्साहन देणारे बाबा
जेव्हा मी उदास असतो किंवा परीक्षेत चांगले कमी गुण मिळतात, तेव्हा बाबा मला कधीच रागावत नाहीत; उलट ते मला समजावून सांगतात आणि माझा आत्मविश्वास वाढवतात, जेणेकरून पुढच्या वेळी मी आणखी मेहनत करून चांगले गुण मिळू शकेल.
बाबांची शिस्तप्रियता आणि योग्य मार्गदर्शन
बाबा खूप जास्त शिस्तप्रिय आहेत. माझ्या चुका झाल्यास ते व्यवस्थित समजून सांगतात आणि माझे कुठे चुकले व मला काय करायला पाहिजे होते हे मला कळते. शाळेच्या अभ्यासातही ते मला खूप जास्त मदत करतात. ते नेहमी मला खरे बोलायला आणि गरजूंची मदत करायला सांगतात.
बाबांचे वेळेचे महत्त्व आणि शिकवण
वेळेची किंमत काय असते हे बाबांनी मला सांगितले आहे. त्यांच्यानुसार, जो माणूस आपला वेळ वाया घालवतो, तो आपले जीवन वाया घालवतो. त्यामुळे त्यांनी दिलेल्या शिकवणीचे पालन करण्याचा मी नेहमी प्रयत्न करत असतो.
माझे बाबा माझे आदर्श माझी प्रेरणा
मला माझ्या बाबांचा खूप खूप आदर आहे, आणि त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून त्यांच्यासारखे बनायचे माझा ध्यास आहे, बाबासारखे उत्तम व्यक्ती बनण्याचा माझा संकल्प आहे.