माझी शाळा सुंदर शाळा निबंध मराठी | Mazi Shala Sundar Shala Nibandh In Marathi.

माझी शाळा सुंदर शाळा निबंध 10 ओळीत

1. माझ्या शाळेचे नाव आदर्श माध्यमिक विद्यालय असून ती खूपच छान आहे.
2. शाळेची उंच आणि आकर्षक इमारत मन मोहून टाकते.
3. शाळेच्या पुढील बाजूस मोठे मैदान आहे, जिथे आम्ही रोज सकाळी प्रार्थना करतो.
4. मला शाळेत अनेक चांगले मित्र आहेत, त्यांच्यासोबत मी शिकतो आणि खेळतो.
5. आमच्या शाळेत सर्व राष्ट्रीय सण अतिशय जोशात साजरे केले जातात.
6. शाळेत एक भव्य ग्रंथालय आहे, जिथे विविध प्रकारची शैक्षणिक आणि ज्ञानवर्धक पुस्तके उपलब्ध आहेत.
7. शाळेत विज्ञान प्रयोगशाळा आहे, जिथे आम्हाला विज्ञानाचे अनेक प्रयोग शिकायला मिळतात.
8. दर आठवड्याला एकदा आम्हाला शारीरिक शिक्षणाचे प्रशिक्षण दिले जाते.
9. शाळेत मला नवनवीन गोष्टी शिकण्याची संधी मिळते.
10. मला माझ्या शाळेत जाणे खूप आवडते कारण ती माझ्या जीवनातील एक महत्त्वाचा भाग आहे.

माझी शाळा सुंदर शाळा दहा ओळी निबंध / Mazi Shala Sundar Shala Nibandh In Marathi 10 lines.

1. माझी शाळा मला चॉकलेटसारखीच आवडते, कारण तिथे मला नेहमी आनंद मिळतो.
2. शाळेत जाण्यासाठी मी दररोज सायकलचा वापर करतो, त्यामुळे मला प्रवासाचीही मजा येते.
3. माझ्या शाळेचा रस्ता खूपच वळणावळणाचा आहे, पण त्याच रस्त्यावरून जाण्यात एक वेगळा आनंद आहे.
4. शाळेच्या परिसरात खूप सुंदर झाडे आहेत, ज्यामुळे परिसर हिरवागार आणि शांत वाटतो.
5. मी रोज हौसेने त्या झाडांना पाणी घालतो आणि त्यांची काळजी घेतो.
6. माझ्या शाळेचे नाव आदर्श विद्यालय आहे, जी परिसरातील आदर्श शाळा आहे. (येथे तुमच्या शाळेचे नाव टाका)
7. शाळेची इमारत उंच आणि आकर्षक आहे, जी मला खूप आवडते.
8. शाळेच्या भिंतींवर सुंदर चित्रे काढली आहेत, जे आमचे मन मोहून टाकतात.
9. शाळेच्या प्रांगणातील फुलांची झाडे येणाऱ्या पाहुण्यांचे जणुं स्वागत करतात.
10. सकाळी शाळेत प्रवेश केल्यावर एक वेगळ्याच जगात प्रवेश केल्यासारखे वाटते, आणि म्हणूनच ही स्वच्छ आणि सुंदर शाळा मला खूप प्रिय आहे.

माझी शाळा सुंदर शाळा निबंध / Majhi shala sundar shala nibandh marathi.

माझी शाळा म्हणजे जणू माझे दुसरे घर आहे. माझ्या शाळेचे नाव महात्मा फुले विद्यालय आहे. शाळेच्या गेटमधून आत गेल्यावर मला खूप प्रसन्न वाटते. शाळेचा परिसर स्वच्छ, हिरवाईने भरलेला असून, वातावरण शांतीदायक आणि आनंदी व उत्साहवर्धक आहे.

शाळेची सुविधा

माझ्या शाळेत सर्व आवश्यक सोयीसुविधा दिलेल्या आहेत. शाळेसमोर मोठे खेळाचे मैदान आहे, जेथे आम्ही खेळाच्या तासात विविध प्रकार खेळतो. प्रत्येक वर्ग प्रशस्त आणि हवेशीर आहे, तसेच सर्व वर्गांत डिजिटल तक्ते बसवले आहेत, ज्यामुळे शिक्षण अधिक मनोरंजक वाटते.

शाळेचे विविध कक्ष

माझ्या शाळेत स्वतंत्र संगणक ,विज्ञान ,वाचनालय, प्रयोगशाळा, सांस्कृतिक कक्ष यांसारखे विविध कक्ष आहेत. हे सर्व कक्ष आम्हाला विविध विषयांचे ज्ञान घेण्यासाठी मदत करतात आणि आमच्या कौशल्यांचा विकास करतात.

शिक्षक आणि शिक्षण पद्धती

शाळेचे सर्व शिक्षक हुशार आणि शिस्तप्रिय आहेत. शाळेतील सर्व शिक्षक मित्र बनुन आमचे उत्तम मार्गदर्शन करतात, आमच्या चुका समजून देऊन आम्हाला सुधारण्यास मदत करतात. आमच्या शाळेत शिस्तीला आणि संस्कारांना विशेष महत्त्व दिले जाते. आमचे मुख्याध्यापक सर्व विद्यार्थ्यांवर लक्ष देतात.

आदर्श शाळा

माझी शाळा ही एक आदर्श शाळा आहे, सांस्कृतिक ,कला, क्रीडा, बौद्धिक या सर्व क्षेत्रात ती नेहमी पुढे असते. शाळेत सतत नवनवीन कार्यक्रम असतात, ज्यामुळे आम्हाला विविध गोष्टी पाहायला व शिकायला मिळतात. आम्हाला शाळेत स्वच्छतेचे महत्व सांगितले जाते. आम्ही सर्व मुले शाळेचे प्रांगण स्वच्छ ठेवण्यासाठी प्रयत्न करतो.

मला माझी शाळा खूप आवडते. ती माझ्यासाठी प्रेरणास्थान आहे आणि तिच्यामुळे मी माझा सर्वांगीण विकास साधू शकतो.

Leave a Comment