इंस्टाग्राम वरून पैसे कसे कमवायचे ? / Instagram Varun Paise Kase Kamvayche in marathi.
बरेच लोक दररोज त्यांचा जास्तीत जास्त वेळ इंस्टाग्रामवर घालवतात आणि त्यावर रिल्स स्क्रोल करतात, इंस्टाग्राम स्टोरी पाहतात, पोस्ट अपलोड करतात. पण इंस्टाग्रामच्या मदतीने पैसेही कमावले जातात हे फार कमी लोकांना माहिती आहे. आजच्या पोस्टमध्ये आम्ही तुम्हा सर्वांना इंस्टाग्रामवरून पैसे कसे कमवायचे त्या विषयी माहिती देणार आहोत.
जेव्हा Tiktok भारतामध्ये खुप जास्त वापरले जात होते, तेव्हा ते शार्ट व्हिडिओ स्वरूपातील मार्केट लीडर होते आणि Tiktok ला भारतात बंदी घातल्याबरोबर, प्रत्येक सोशल मीडिया कंपनी या शार्ट व्हिडिओ मार्केटवर कब्जा करण्याचा प्रयत्न करत आहे. इंस्टाग्राम असो, यूट्यूब असो, इतर अनेक प्लॅटफॉर्म तयार झाले आहेत.
त्यामुळे आजच्या काळात परिस्थिती अशी आहे की तुम्ही कोणतेही प्लॅटफॉर्म वापरत असाल तर तुम्हाला तिथे भरपूर ऑरगॅनिक पोहोच / रीच मिळते आणि इन्स्टाग्रामवरही त्याच प्रकारची पोहोच मिळते. मग त्यासाठी तुम्हाला फक्त काय करावे लागेल? इंस्टाग्रामवर रेग्युलरपणे रिल्स अपलोड करणे आवश्यक आहे आणि मित्रांनो, आजच्या वेळेला, आपण रिल्समधून जबरदस्त रिच मिळवू शकता. अशी अनेक अकाऊंट्स देखील आहेत ज्यांनी नुकतेच इन्स्टाग्रामवर एक पेज तयार केले आणि त्या पेजवर काही रिल्स अपलोड केल्या आणि त्या खूप व्हायरल झाल्या.
इंस्टाग्राम मधून पैसे कसे कमवायचे ? / How To Earn Money From Instagram In Marathi 2024.
इंस्टाग्राम मधून पैसे कसे कमवायचे ? या पोस्टमधे आम्ही तुम्हाला असे आठ मार्ग सांगणार आहे ज्याच्या मदतीने तुम्ही इन्स्टाग्रामवरून सहज पैसे कमवू शकता.
इंस्टाग्राम बोनस
जर तुम्हाला असे वाटत असेल की तुम्हाला एखाद्या विशिष्ट गोष्टीत खूप चांगले ज्ञान आहे किंवा तुम्हाला एखाद्या क्षेत्रात खूप रस आहे, तर तुम्ही फक्त काय करू शकता? तुम्ही इंस्टाग्रामवर तुमचे प्रोफाइल तयार करू शकता आणि त्यानंतर तुम्ही नियमितपणे तेथे दर्जेदार कंटेंट अपलोड करू शकता.
जर तुम्हाला एखाद्या क्षेत्रात खूप रस असेल तर सर्वप्रथम तुम्ही त्या क्षेत्राशी संबंधित रिसर्च करू शकता. तुम्हाला कंटेंटची जी कॅटेगरी आवडेल त्यानुसार तुम्ही रील बनवू शकता आणि अपलोड करू शकता. त्यामुळे तुमच्या रीलला जितके जास्त व्ह्यूज मिळतील, तितके ते व्हायरल होईल त्यानुसार तुम्हाला पैसे मिळतात.
Instagram मधून पैसे कसे कमवायचे?
नुकतेच काही काळापूर्वी इन्स्टाग्रामने एक फीचर लाँच केले त्याचे नाव “इंस्टाग्राम रिल्स बोनस” आहे, त्यामुळे Creator कोणतेही असोत, जे इंस्टाग्रामच्या प्लॅटफॉर्मवर नियमितपणे चांगले content अपलोड करत असतात, त्यांना इन्स्टाग्रामकडून बोनस मिळतो. ज्याला रील बोनस म्हणतात. परंतु जर तुमची सामान्य प्रोफाइल असेल किंवा तुमची वैयक्तिक प्रोफाइल असेल, तर तुम्हाला हा बोनस मिळणार नाही.
तुमच्याकडे इंस्टाग्रामवर व्यवसाय प्रोफाइल किंवा क्रिएटर प्रोफाइल असणे आवश्यक आहे. जर तुम्हाला इंस्टाग्रामवर पैसे कमवायचे असतील तर तुमच्या सामान्य प्रोफाइलला तुम्हाला स्विच करून “बिजनेस प्रोफाइल” किंवा “क्रिएटर प्रोफाइल” करावे लागेल.
इन्स्टाग्रामवर रिल्स viral कसे करावे?
जेव्हा तुम्ही इन्स्टाग्रामवर इंफ्लुएंसर बनता, तेव्हा तुम्ही नियमितपणे विविध प्रकारचे रील्स अपलोड कराल आणि तुम्ही जितक्या जास्त रील अपलोड कराल, तितकी ती व्हायरल होण्याची शक्यता जास्त असते. येथे एक रिल्स viral करण्यासाठी साधी ट्रिक आहे की तुम्ही एका दिवसात किमान तीन रील अपलोड केले पाहिजेत.
रिल्स सकाळी एक, दुपारी एक आणि संध्याकाळी एक, अपलोड करा. तुम्ही जितके जास्त रिल्स अपलोड कराल, तितकी जास्त शक्यता आहे की ती अधिक लोकांपर्यंत पोहोचेल आणि जितके जास्त व्ह्यूज येतील, तितके चांगले एंगेजमेंट होईल, तुम्हाला रीलचा चांगला बोनस मिळेल.
मला instagram बोनस मिळेल की नाही ते कसे कळेल?
- आता तुम्ही असा विचार करत असाल की मला बोनस मिळेल की नाही हे तुम्हाला कसे कळेल, तर त्यासाठी तुम्हाला इन्स्टाग्राम सेटिंगमध्ये ऑप्शन आहे त्यावर जावा लागेल.
- त्यानंतर क्रिएटर नावाचा एक ऑप्शन तिथे तुम्हाला दिसेल,त्यावर तुम्हाला क्लिक करायचे आहे.
- जर तुम्हाला तिथे बोनसचा पर्याय दिसत असेल तर तुम्हाला तो मिळेल आणि जर तिथे बोनसचा ऑप्शन नसेल तर तुम्हाला मिळणार नाही.
- जर सध्या तुम्हाला इंस्टाग्राम बोनसचा ऑप्शन शो होत नसेल तरी तुम्ही नियमित मेहनत करत राहिल्यास काही काळानंतर बोनसचा ऑप्शन शो होऊ शकतो आणि तिथून तुम्हाला पैसेही मिळू लागतील.
क्रिएटर बनून
सर्वप्रथम, तुम्ही रिल्स बोनसमधून पैसे कमवू शकतात, समजा तुम्ही त्यासाठी पात्र नसाल तर तुम्ही आणखी तीन मार्गांनीही कमाई करू शकता.
ब्रँड्स प्रमोशन
मोठ्या ब्रँड्सना त्यांच्या प्रॉडक्टबद्दल अधिकाधिक लोकांपर्यंत पोहचावयचे असते. आता तुमचे एक मीम पेज आहे, त्यावर अनेकजण फॉलो करत आहेत, मग ब्रँड तुम्हाला त्यांचे प्रॉडक्टचे प्रमोशन करण्यासाठी कॉन्टॅक्ट करून पैसे देतील.
तुम्ही ब्रँडसह सहयोग / collaboration करून, तुम्ही एकतर रील तयार करून टाकू शकता किंवा तुम्ही त्यांच्या प्रॉडक्ट संबंधित मीम ठेवू बनवुन पोस्ट करू शकता. तुमची रील किंवा मीम पोस्ट जितकी जास्त व्हायरल होईल तितके तुम्हाला ब्रँडकडून जास्त पैसे मिळतील.
रेफरल लिंक
तिसरा मार्ग म्हणजे तुम्ही कंपनीची रेफरल लिंक तुमच्या पेजवर टाकू शकता. उदाहरणार्थ, खूप सारे असे ब्रँड आहे, जे त्याच्या वेबसाइट किंवा अँपवर अधिकाधिक लोकांच्या visit आणि डाउनलोड हव्या असतात.
तुम्ही तुमच्या Bio मध्ये बँडने दिलेल्या वेबसाईट किंवा अँपची लिंक टाकू शकता, मग तुमचे फॉलोअर्स Bio वरून त्या लिंकवर क्लिक करतील, ते त्यांच्या वेबसाइटवर पोहोचतील आणि तिथे जाऊन ते प्रॉडक्ट खरेदी करू शकतात किंवा त्यांनी दिलेल्या सेवा ते खरेदी करू शकतात. शेवटी कंपनीला फायदा होईल आणि तुम्हाला रेफरल करण्यासाठी पैसे मिळतील.
शॉपिंग पेज
मित्रांनो, तुम्हाला इन्स्टाग्रामवर एक पेज बनवावे लागेल आणि त्याचा उद्देश एकच असेल की तुम्हाला तेथून तुमचे प्रॉडक्ट विकायचे आहे. त्यामुळे तुम्ही जे काही प्रॉडक्ट विकणार आहात, त्याचे तुम्हाला वेगवेगळ्या रील शूट कराव्या लागतील आणि त्याच वेळी त्याचे खूप चांगले फोटो काढावे लागतील. आणि त्यानंतर तुम्हाला तुमच्या पेज वर अपलोड करायचे आहे. जसे आम्ही तुम्हाला आधीच सांगितले आहे की आजच्या काळात इंस्टाग्रामवर खूप जास्त लोकांपर्यंत जबरदस्त पोहच / रिच मिळते. त्यामुळे तुम्ही जे काही रील अपलोड कराल, कोणतीही पोस्ट अपलोड कराल इंस्टाग्राम ते रिल्स आणि फोटो अनेक लोकांना दाखवते.
तुम्ही रिल्स किंवा पोस्ट शेअर केल्यावर तुमची प्रॉडक्ट आवडणारे लोक काय करतील? कमेंट बॉक्समध्ये किंमत किती आहे विचारतील. त्याचबरोबर ते लोक तुम्हाला डीएम करतील. याशिवाय, तुम्हाला हवे असल्यास, तुम्ही तुमच्या इंस्टाग्राम Bio मध्ये तुमच्या WhatsApp ची लिंक देऊ शकता. त्यामुळे ग्राहक तुमच्याशी व्हाट्सअपद्वारे थेट चॅट करू शकतात. याशिवाय, जर तुम्ही आधीच ई-कॉमर्स वेबसाइट तयार केली असेल, तर तुम्ही तुमच्या ई-कॉमर्स वेबसाइटची लिंक देखील देऊ शकता. त्यामुळे ग्राहक त्यावर क्लिक करताच, ते थेट तुमच्या ई-कॉमर्स वेबसाइटवर पोहोचतील आणि तेथून प्रॉडक्ट खरेदी करू शकतात.
आता या प्रकारचे काम सुरू करण्यासाठी तुम्हाला आधी काय करावे लागेल ते पहा, तुमच्या घराच्या जवळ कोणी मॅन्युफॅक्चरर आहे का ते पाहावे लागेल. किंवा जर एखादा मोठा होलसेलर विक्रेता किंवा डिस्ट्रीब्यूटर असेल तर तुम्हाला तिथून काही प्रॉडक्ट खरेदी करावी लागतील.
त्यानंतर त्या प्रॉडक्टची चांगली फोटोग्राफी करून घ्या तसेच छोट्या छोट्या रील्स शूट करून त्या नियमित अपलोड कराव्या लागतील. सुरुवातीला तुमची थोडीशी गुंतवणूक यात लागणार आहे. याशिवाय मित्रांनो तुम्ही प्रॉडक्टची रिसेलिंग करून देखील इंस्टाग्राम वरून पैसे कमवू शकतात.
रिसेलिंग करून इंस्टाग्रामवर पैसे कमवा
तुमच्या जवळ एखादा मॅन्युफॅक्चर किंवा होलसेलर विक्रेता किंवा मोठा डिस्ट्रीब्यूटर असेल तर त्याच्याशी जाऊन बोला, त्याला सांगा की मी तुमच्या प्रॉडक्टचे मार्केटिंग करेन. आणि ज्या काही ऑर्डर येतील, तुम्हाला त्या होलसेलर विक्रेताला सांगायचे आहे की कोणत्या ग्राहकाला कोणती ऑर्डर करायची आहे. होलसेलर विक्रेता प्रॉडक्ट पॅक करून दिलेल्या पत्यावर प्रॉडक्ट पाठवून देईल.
तर, उदाहरणार्थ, जर एखादे प्रॉडक्ट आहे ज्याची किंमत ₹ 500 आहे, तर तुम्ही ग्राहकाला सांगितले की ते उत्पादन ₹ 800 आहे, तर जो कोणी होळसेलर प्रॉडक्ट तयार करेल,पॅक करेल आणि ग्राहकाच्या ठिकाणी पाठवेल त्याला ₹ 500 देऊन तुम्हाला 300₹ चा नफा मिळेल.
त्यामुळे तुम्हाला रिसेलिंगमध्ये जास्त गुंतवणूक करण्याची गरज भासणार नाही. याशिवाय आणखी एक गोष्ट आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो. पाहा, सर्वप्रथम तुम्हाला हे समजून घ्यावे लागेल की तुमच्या इंस्टाग्राम पेजवर प्रेक्षक कसे आहेत? तुम्हाला इन्स्टाग्रामवर सर्वात जास्त तरुणाई मिळणार आहे, त्यामुळे तुम्ही जे काही प्रॉडक्ट विकणार आहात, ते असे असले पाहिजे की ते तरुणांना आकर्षित करतील. तर मित्रांनो, तुम्हाला हवे असल्यास, तुम्ही शूज विकू शकता.
तुम्ही तरुणांसाठी टी-शर्ट, शर्ट, जीन्स किंवा कोणतीही ट्रेडिंग प्रॉडक्ट विकू शकता. इंस्टाग्राम रिल्स आणि पोस्टमधून तुम्हाला ऑर्डर मिळण्यास सुरुवात होईल. समजा, तुमच्या पेजवर 10,000 फॉलोअर्स असतील तर तुम्हाला रोज पाच ते 10 ऑर्डर्स मिळतील, पण मित्रांनो, तुम्हाला दोन गोष्टींची काळजी घ्यावी लागेल.
सर्वप्रथम, तुम्हाला नियमितपणे रील्स तयार करून अपलोड करावे लागतील आणि दुसरे म्हणजे, तुम्हाला फक्त एकच कॅटेगिरी पकडून हे काम करावे लागेल आणि त्या प्रॉडक्ट संबंधित वेगवेगळे फोटो आणि रील अपलोड कराव्या लागतील.उदाहरणार्थ, जर तुम्हाला शूज विकायचे असतील तर तुम्ही वेगवेगळ्या प्रकारच्या शूजचे फोटो अपलोड करू शकता. एकदा शर्टचा फोटो टाकला ,एकदा तुम्ही चप्पल विकत असाल, एकदा पंखे विकत असाल, तुम्ही एसीच्या प्रॉडक्टची पोस्ट टाकत असाल तर अश्या प्रकारे तुमच्याकडे एका कॅटेगिरीचे फॉलोवर जमा होणार नाहीत.
तुम्ही कोणतीही एक कॅटेगिरी पकडून त्यावर सारे रिल्स आणि पोस्ट टाकल्या पाहिजे. त्यामुळे जेव्हा जेव्हा एखादा ग्राहक तुमच्या पेजवर येतो तेव्हा त्याला एका प्रॉडक्ट कॅटेगिरीमध्ये अनेक पर्याय मिळतील, त्यानंतर त्याला तिथे जे काही आवडेल, तो तुमच्याशी संपर्क साधून खरेदी करू शकतो.
आजच्या काळात, कोणताही व्यवसाय कोणतेही प्रॉडक्ट विकतो, तर ते निश्चितपणे इन्स्टाग्रामवर स्वतःचे पेज तयार करतात. त्यामुळे तुम्हाला हवे असल्यास तुम्हीही असे पेज तयार करून प्रॉडक्ट विकू शकता आणि जबरदस्त पैसे कमवू शकता.
अफिलिएट मार्केटिंग
पेज बनवण्याचा पद्धतीच्या आत, आम्ही तुम्हाला सांगितले की तुम्ही तुमचे स्वतःचे प्रॉडक्ट खरेदी करू शकता किंवा तुम्ही कोणत्याही होलसेलर किंवा वितरकाशी संपर्क साधू शकता आणि त्यांचे प्रॉडक्ट विकू शकता. जर तुम्हाला ही ती पध्दत नको असेल तर तुम्ही एफिलिएट मार्केटिंग करून इन्स्टाग्रामवरून पैसे कमवू शकता.
आजच्या काळात, असे अनेक प्लॅटफॉर्म आहेत, जे तुम्हाला Amazon, Myntra, Ajio, flipcart सारख्या वेबसाईट एफिलिएट मार्केटिंगचा पर्याय देतात. जितक्या वेबसाईट ऑनलाइन प्रॉडक्ट सेल करतात त्या अफिलिएटचा ऑपशन देत असतात.
मग तुम्हाला फक्त काय करायचे आहे? त्यांच्या प्रॉडक्ट्सला तुमच्या इन्स्टाग्रामवर प्रमोट करावे लागेल. जर कोणी त्यांचे प्रॉडक्ट विकत घेतले तर तुम्हाला चांगले कमिशन मिळते. याशिवाय तुम्हाला कोणतेही खर्च करण्याची गरज नाही, जसे की प्रॉडक्ट पॅकिंग, प्रॉडक्ट कॉलिटी, डिलिव्हरी या कशाची तुम्हाला विचार करायची गरज नाही तुम्हाला फक्त instagram वर प्रॉडक्ट ला प्रमोट करायचे आहे. इंस्टाग्राम वर तुम्हाला ऑरगॅनिक रिच मिळेल
तुम्हाला फक्त मल्टिपल रील्स तयार कराव्या लागतील आणि त्याच प्रकारे तुमच्या पेजवर प्रॉडक्टचे जास्त फोटो अपलोड करावे लागतील आणि जर एखाद्या ग्राहकाला तुमचे प्रॉडक्ट आवडले तर, तो कमेंट करेल किंवा तुम्हाला DM करेल, मग तुम्ही त्याला फक्त प्रॉडक्टची लिंक द्या. त्यानंतर तो लिंकवर क्लिक करेल आणि वेबसाइटवर जाईल व तिथे जाऊन खरेदी करेल आणि तुम्हाला त्या खरेदीमागे कमिशन मिळेल.
आजच्या काळात, असे बरेच लोक आहेत जे इन्स्टाग्रामच्या मदतीने एफिलिएट मार्केटिंग करत आहेत आणि त्यांना मिळत असलेल्या ऑरगॅनिक रिच / पोहोचचा फायदा घेऊन भरपूर पैसे कमावत आहेत.
तुम्ही इन्स्टाग्रामवर जाऊन तपासलात तर तुम्हाला अनेक प्रोफाईल सापडतील जे एफिलिएट मार्केटिंग करत आहेत. दुसऱ्याचे प्रॉडक्ट विकून भरपूर पैसे कमावतात. याशिवाय, आम्ही तुम्हाला एक गोष्ट सांगू इच्छितो की, इन्स्टाग्रामवर फक्त एकच पेज तयार करणे बंधनकारक नाही. तुम्ही Instagram वर अनेक pages तयार करू शकता, अनेक रील तयार करू शकता आणि वेगवेगळ्या पेजवर नियमितपणे रील अपलोड करू शकता. त्यामुळे कुठे ना कुठे तुमची रील नक्कीच व्हायरल होईल आणि तुमची कोणतीही रील व्हायरल झाली की तुम्हाला तिथून जबरदस्त प्रतिसाद मिळेल. तुमची प्रॉडक्ट प्रचंड प्रमाणात विकली जातील आणि तुम्ही खूप पैसे कमवू शकाल.
मीम पेज
मित्रांनो, जर तुम्हाला वाटत असेल की तुम्हाला विनोदाचे चांगले ज्ञान आहे, आणि तुम्ही ट्रेंडी गोष्टींमधून विनोद काढू शकता. तर तुम्ही सिम्पल एक मीम पेज क्रिएट करू शकतात. त्यानंतर, तुम्ही ट्रेंडिंग असलेल्या गोष्टींशी संबंधित मीम्स तयार करू शकता आणि ते तुमच्या पेजवर अपलोड करू शकता.
तुम्ही तुमच्या आवडीनुसार मीम रील स्वरूपात बनवू शकता किंवा तुम्ही पोस्ट तयार करू शकता. पहा मीम्स ही अशी गोष्ट आहे जी प्रत्येकाला वाचायला आवडते. जर एखाद्या व्यक्तीला एखादे मीम आवडले तर ते त्यांच्या मित्र-परिवार सोबत 100% शेअर करतात. तुमच्या मीमला जितके जास्त व्ह्यूज मिळतील, तितके जास्त लोकांना ते आवडेल, त्यामुळे तुम्ही जास्त पैसे कमवू शकाल. आता तुम्ही मीम पेज बनवून एकूण चार मार्ग कमाई कमाई करु शकतात.
पेज प्रमोशन
जर एखादा ब्रँड किंवा नवीन क्रिएटर असेल, त्यांना त्यांच्या पेजचा प्रचार करायचा असेल, तर तुम्ही थोडी रक्कम किंवा मोठी रक्कम किंवा तुम्हाला हवी ती रक्कम आकारू शकता आणि त्यांच्या पेजचे प्रमोशन करू शकता. तुमचे खूप सारे फॉलोअर्स असतील, तर तुम्ही पोस्ट टाकून तुमच्या फॉलोअरला दुसरे पेज फॉलो करायला सांगू शकतात. पेज पमोशन करून तुम्ही डेली इन्स्टाग्रामवरून पैसे कमवू शकतात.
हे तुमचे इंस्टाग्राम पेज असेल, याच्या वर तुम्हाला जास्तीत जास्त पोस्ट अपलोड कराव्या लागतील, रील अपलोड कराव्या लागतील आणि जे काही तुमचे content असेल ते थोडे क्रिएटिव्ह असले पाहिजे.
तुमच्या पोस्ट व रिल्स पाहायला व वाचायला लोकांना आवडल्या पाहिजे. तुम्हाला असे content तयार करावे लागेल जे लोकांना शेअर करावेसे वाटेल. तुम्हाला असे मीम्स तयार करावे लागतील आणि त्यातून तुम्ही खूप सारे पैसेही कमवू शकता.
ट्रेनिंग
मित्रांनो, जर तुम्हाला वाटत असेल की तुम्ही एखाद्या विशिष्ट क्षेत्रातील तज्ञ आहात, जसे शेअर बाजार किंवा कोडिंग किंवा तुम्ही इतर कोणत्याही क्षेत्रात खूप एक्स्पर्ट आहात. जर तुम्हाला वाटत असेल की तुम्ही ते ज्ञान इतर कोणाशी तरी शेअर करू शकता, तर तुम्ही यामध्ये काय करू शकता, तुम्ही एक कोर्स तयार करू शकता किंवा तुम्ही लाइव क्लास घेऊ शकता, वेबिनार घेऊ शकता. तुम्ही डिजिटल प्रॉडक्ट बनवू शकता आणि तुम्ही ते Instagram च्या मदतीने विकू शकता आणि भरपूर पैसे कमवू शकता.
उदाहरण म्हणून शेअर मार्केट पाहिले तर, आजच्या काळात शेअर मार्केटमध्ये खूप लोकांना intrest आहे आणि त्यांना शेअर बाजारातून पैसे कमवायचे आहेत.
जर तुम्हाला शेअर बाजाराचे खरेच ज्ञान असेल तर तुम्ही काय करू शकता? तुमच्या फॉल्लोवरला शेर मार्केटबद्दल प्रशिक्षण देऊ शकतो आणि भरपूर पैसे कमवू शकता.
इंस्टाग्रामच्या मदतीने तुम्ही तुमच्या प्रशिक्षणाव्यतिरिक्त सेवांचे मार्केटिंग करू शकता. येथून तुम्हाला चांगले ग्राहक मिळू शकतात. तुमची इच्छा असल्यास, तुम्ही त्यांना तुमच्या वेबसाईटच्या लँडिंग पेजवर घेऊन जाऊ शकता, तुम्ही त्यांना तुमच्या वेबसाइटवर नेऊ शकता किंवा तुम्ही तुमचा कोर्स किंवा लाइव्ह वेबिनारवर त्यांना घेऊन जाऊ शकता. तुम्ही तुमचा ट्रेंनिग कोर्स त्यांना विकू शकता आणि भरपूर पैसे कमवू शकता.
Final Word :-
आजच्या पोस्टमध्ये दिलेल्या आठ इंस्टाग्राममधून पैसे कमवण्याचे मार्गांच्या मदतीने बरेच लोक पैसे कमवत आहेत. तर मित्रांनो, जर तुम्ही खरच खूप मेहनत घेतली तर नक्कीच तुम्हाला सुद्धा कमाई करता येईल. तुम्हाला फक्त काय करावे लागेल? या आठ पद्धतींपैकी कोणतीही एक पद्धत निवडायची आहे. त्यामध्ये मनापासून मेहनत करायची आहे,त्याचा परिणामी तुम्हाला इंस्टाग्रामवर यश नक्कीच मिळेल.