ग्रामीण भागातील व्यवसाय आयडिया / Rural Business Ideas In Marathi.
जर तुम्ही नोकरीला वैतागले असाल किंवा तुम्ही बेरोजगार आहात व तुम्ही एक छोटा व्यवसाय सुरू करून पैसे कमवू इच्छित असाल तर आजच्या पोस्टमध्ये आम्ही काही बिझनेस आयडिया घेऊन आलो आहोत ज्या तुम्ही कमी इन्व्हेस्टमेंट मध्ये गावांमध्ये राहून करू शकता. जसे जसे तुमचे उत्पन्न वाढेल त्याप्रमाणे तुम्ही तुमचा बिजनेस वाढवू शकता.
गाव व्यवसाय आयडिया मराठी | Village Business Ideas In Marathi.
डिजिटल सेवाकेंद्र / Digital Service Centre :-
गावात आजपण खूप साऱ्या लोकांना कोणता फॉर्म भरायचा असेल,ऑनलाईन जॉब फॉर्म भरायचा असेल किंवा आधारकार्ड व पॅनकार्ड काढायचे असेल, पैसे ट्रान्स्फर करायचे असेल किंवा कोणतेही छोटे मोठे ऑनलाईन काम करायचे असेल तर गावात सुविधा नसल्यामुळे त्यांना अडचणी येतात.
तुम्ही पतसंस्था,बँक,कॉलेजच्या बाहेर डिजिटल सेवाकेंद्र टाकून ऑनलाईन फॉर्म भरून देऊन चांगले पैसे कमवू शकतात.
मेणबत्ती व्यवसाय / Candle Business :-
मेणबत्ती व्यवसाय दहा ते बारा हजाराच्या इन्वेस्टमेंट मध्ये चालू केला जाऊ शकतो. मेणबत्तीचा वापर आजच्या टाईम मध्ये ज्यादातर डेकोरेशन साठी केला जातो. हॉटेल, रेस्टॉरंट ,घरे इत्यादी ठिकाणी मेणबत्तीचा वापर मोठ्या प्रमाणात होतो त्यामुळे मेणबत्तीची डिमांड वाढत आहे. पहिले फक्त लाईट गेल्यावर मेणबत्तीचा वापर केला जायचा परंतु आत्ता सजावटीच्या गोष्टींमध्ये मेणबत्तीचा वापर केला जातो. तुम्ही सुंदर दिसणाऱ्या मेणबत्ती चा व्यवसाय करून लाखो रुपये कमवू शकता.
आरो वॉटर व्यवसाय / RO Water Business :-
मित्रांनो आजच्या वेळेला प्रत्येक माणूस हायजेनिक पदार्थ खाऊ इच्छितो तसेच स्वच्छ पाणी पिऊ शकतो, पण आज पण आपल्या गावांमध्ये बऱ्याच लोकांना स्वच्छ पाणी प्यायला मिळत नाही. शहरांमध्ये मुन्सिपल पार्टी मार्फत घरांमध्ये डायरेक्ट नळांना स्वच्छ पिण्यायोग्य पाणी येते, परंतु आजही आपल्या गावांमध्ये 42 टक्के लोकांना पिण्यायोग्य पाणी मिळत नाही ते हँड पंप किंवा विहिरीतील व बोर मधील पाणी पितात. अशा प्रकारचे पाणी बऱ्याच साऱ्या आजारांना आमंत्रण देते जसे की टायफाईड कावीळ थायराइड व अनेक आजार हे दूषित पाणी पिल्याने होतात.
जर तुमच्या गावांमध्ये विहिरीचे किंवा बोरचे पाणी पिले जात असेल तर तुम्ही आरो वॉटर प्लांट लावून पाणी विकून पैसे कमवू शकतात. तुम्ही गावातील लोका व्यतिरिक्त तुमच्या गावाच्या आसपासच्या सर्व दुकानांना आरो वॉटर विकू शकता तसेच लग्न समारंभ कार्यक्रमात आरो वॉटर चे जार विकू शकतात.आरो वॉटर प्लांट लावायचा म्हणजे तुम्हाला काही वॉटर प्युरिफायर मशीनरी लागतील त्याचबरोबर तुम्हाला काही जार तसेच जारची डिलिव्हरी करायला चार चाकी गाडी लागेल.
सिमेंट ब्रिक्स व्यवसाय / Cement Bricks Business :-
प्रत्येक जण आज पक्या व मोठ्या घरात राहू इच्छित आहे या घरांना बनवायला विटांची गरज असते.जर तुम्ही सिमेंट ब्रिक्स व्यवसाय सुरू करू इच्छित असाल तर तुम्ही कमीत कमी फक्त 50 हजार रुपयेमध्ये अशी मशीन विकत घेऊ शकता.सिमेंट ब्रिक्स बनवणारी मशीन घेऊन तुम्ही कमी इन्व्हेस्टमेंटमध्ये 50 हजार रुपये ते 1 लाख रुपये सहज कमवू शकता.
फुलशेती व्यवसाय / Floriculture business :-
फुले एक अशी गोष्ट आहे तिचा उपयोग सर्व ठिकाणी केला जातो.मंदिरात,डेकोरेशनमध्ये, परफ्यूम,औषधी चहा बनवण्यासाठी इत्यादी ठिकाणी फुलांची डिमांड असते.सगळ्यात पहिले तुम्ही तुमच्या इकडच्या मार्केटमध्ये सर्वात जास्त विकले जाणारे व सर्वात महाग फुले कोणती आहे याची माहिती घ्या.त्यानंतर तुम्ही तुमच्या शेतांत फुलांची शेती करू शकतात.गावांकडे तुम्हाला या शेतीसाठी आवश्यक सर्व गोष्टी अगदी आरामात मिळून जातील.
कुक्कुटपालन व्यवसाय / Poultry business :-
जर तुम्ही पोल्ट्रीफार्म बिजनेस करण्याचा विचार करत असाल तर तुम्हाला सांगू इच्छितो हा व्यवसाय खूप जास्त फायदेशीर आहे.सरकारद्वारे पोल्ट्रीफार्म बिजनेससाठी खूप साऱ्या योजना राबविण्यात येत आहेत.कोणत्याही व्याजाशिवाय तुम्हाला बऱ्याच योजना मध्ये सरकार या व्यवसायाला कर्ज पुरवते.तुम्ही अगदी कमी भांडवलमध्ये व कमी जागेत कुक्कुटपालन व्यवसाय सुरू करून पैसे कमावू शकतात.
पेपरचे कप व्यवसाय / Paper Cup Business :-
आपल्या देशात प्लॅस्टिक वर बंदी घालण्यात आली आहे त्यामुळे पेपरच्या कपची मागणी मोठ्या प्रमाणात अचानक वाढली आहे.पेपरचे कप एक असे प्रोडक्ट आहे त्याचा वापर चहाच्या टपरीपासून ते मोठमोठ्या हॉटेल मध्ये पेपर कपचा दैनंदिन जीवनात वापर होतो.पेपर कप मुळे पर्यावरणाला नुकसान पोहचवत नाही.अशा मध्ये तुम्ही पेपर कपचा उद्योग कराल आपल्या आसपास पेपर कपचा सप्लाय कराल तर खूप जास्त प्रॉफिट तुम्ही यातून घेऊ शकता.पेपर कपची मशिनरी ही महाग आहे तुम्हाला 10 लाख पर्यंत यासाठी पैसे लागू शकतात परंतु एकदा पैसे इन्व्हेस्ट केल्यावर नंतर तुम्हाला जास्त खर्च येत नाही.
शेणाची कुंडी व्यवसाय :-
आजच्या मार्केटमध्ये शेणाच्या कुंड्यांची मागणी चांगली आहे.कुंडी शेणापासून बनल्यामुळे याचे विशेष महत्त्व असते.सिमेंट आणि मातीच्या कुंड्यांच्या मानाने शेणापासून बनलेली कुंडी विषेध आणि पर्यावरणपूरक असते.कारण शेणाची कुंडी ताप नियंत्रक व वायूचा उत्सर्जक असतो,तसेच आशा कुंड्यांमध्ये झाडांची वाढ चांगली होते.
त्याच बरोबर जर शेणाची कुंडी तुटली तर शेतात खत म्हणून किंवा दुसऱ्या कुंडयाना खत म्हणून पण कामी येते.शेणापासून कुंडी बनवण्याची मशीन 25 ते 50 हजारांच्या मध्ये मिळून जाते व ही मशीन दिवसाला 500 कुंड्या बनवू शकते.या कुंड्या तुम्ही 30 ते 50 रुपयेला विकून चांगले पैसे कमवू शकतात.