टॉप 10 शॉप बिजनेस आयडिया मराठी | Shop Business Ideas In Marathi 2024.

किरकोळ व्यवसाय आयडिया मराठी / Retail Business Ideas In Marathi 2024.

Shop Business Ideas In Marathi

मित्रांनो आजच्या आपल्या पोस्टमध्ये आप शॉप बिजनेस आयडियाज / Shop Business Ideas In Marathi पाहणार आहोत. या शॉप बिझनेस आयडिया च्या मदतीने तुम्ही शॉप टाकून तुमचा नवीन व्यवसाय चालू करू शकतात. या सगळ्या प्रॉफिटेबल शॉप बिझनेस आयडिया आजच्या पोस्टमध्ये आम्ही दिल्या आहेत.अगदी कमी गुंतवणूक करून तुम्ही हे शॉप व्यवसाय करू शकतात व एक चांगले प्रॉफिट कमवू शकतात.

आजचा आपल्या पोस्टमध्ये काही स्टोर व्यवसाय आयडिया / Store Business Ideas In Marathi फार नवीन आहेत तर काही वर्षानुवर्ष चालत आलेले शॉप व्यवसाय आयडिया आहेत. या दुकान व्यवसाय कल्पनातून काही व्यवसाय तरी तुमच्या कामाचे असतील त्यामुळे पोस्ट शेवटपर्यंत नक्की वाचा.

शॉप बिजनेस आयडिया मराठी / Shop Business Ideas In Marathi.

1) पाळीव प्राण्यांच्या वस्तूंचे शॉप :-

मित्रांनो तुमच्या घराच्या आसपास तुम्ही एक असे शॉप उघडू शकता जिथे पाळीव प्राण्यांचे ॲक्सेसरीज मिळतील. पाळीव प्राण्यांच्या वस्तूंबरोबर तुम्ही पाळीव प्राण्यांची ग्रूमिंग देखील करू शकतात. पाळीव प्राण्यांच्या वस्तू व पाळीव प्राण्यांचे खाद्यपदार्थ तुम्ही तुमच्या दुकानात विक्रीसाठी ठेवू शकतात.

तुम्हाला या व्यवसायासाठी 3 ते 4 लाख रुपयांचे भांडवल लागेल. आज पण बऱ्याच शहरांमध्ये अशा प्रकारचे दुकाने फार कमी आहेत त्यामुळे तुमच्या व्यवसायला स्पर्धा कमी राहील त्यामुळे तुम्हाला चांगले प्रॉफिट या व्यवसायातून मिळेल.

2) डिजिटल सर्विस सेंटर शॉप :-

तुम्ही तुमच्या शहरांमध्ये शाळा, कॉलेज, बँक इत्यादी गर्दीच्या ठिकाणांच्या आसपास डिजिटल सर्विस सेंटर सुरू करू शकतात. डिजिटल सर्विस सेंटर मध्ये तुम्ही पॅनकार्ड ,आधारकार्ड ,विविध दाखले, सरकारी योजनाचे फॉर्म, सरकारी नोकरीचे फॉर्म, बँक खाते ओपनिंग फॉर्म इत्यादीचे ग्राहकांना फॉर्म भरून देऊन चांगले पैसे कमवू शकतात.

या डिजिटल सर्विस सेंटर शॉप मध्ये तुम्ही फोटोच्या कॉपी देऊ शकतात. आधारकार्ड पॅन कार्ड काढून देण्याचे व त्यांना दुरुस्ती सर्विसेस चालू करू शकतात. अशा प्रकारच्या सर्विस सेंटर शॉपमध्ये तुम्हाला खूप सार्‍या सर्विसेस देता येतील व तुम्हाला कधीही ग्राहकांची कमी पडणार नाही. या डिजिटल सर्विस सेंटर व्यवसायाची वैशिष्ट्ये म्हणजे तुम्ही एका कम्प्युटरच्या मदतीने हा व्यवसाय सुरू करू शकतात.

स्टोर बिजनेस आयडिया मराठी / Store Business Ideas In Marathi.

3) हार्डवेअर शॉप :-

मित्रांनो आपल्या घरामध्ये व कन्स्ट्रक्शनमध्ये बऱ्याच साऱ्या अशा प्रोडक्टचा वापर होतो जे हार्ड वर्कशॉपमध्ये मिळतात. फर्निचर, कारपेंटर, कन्स्ट्रक्शन अश्या बऱ्याच कामांसाठी हार्डवेअरची खूप मोठ्या प्रमाणात डिमांड आहे. हार्डवेअरची डिमांड असल्यामुळे तुम्ही एक छोटा शॉप सुरू करून चांगले प्रॉफिट कमवू शकतात.

हार्डवेअर शॉपमध्ये तुम्हाला पाच ते दहा लाख रुपये इतकी इन्व्हेस्टमेंट करावी लागते व तुम्ही दररोजचे पाच ते सहा हजार रुपये प्रॉफिट कमवू शकतात.
जर तुम्ही असा व्यवसाय पाहत असाल ज्यामध्ये वस्तूची कोणती एक्सपायरी नाही व जो व्यवसाय बाराही महिने चालत राहील तर तुम्ही हार्डवेअरचा व्यवसाय सुरू करू शकतात.

सायकल व इलेक्ट्रिकल मोटरसायकल रेंटल शॉप :-

मित्रांनो दिवसेंदिवस पेट्रोल डिझेलचे भाव वाढत चालले आहेत व नैसर्गिक तेलाच्या साठ्यामध्ये दिवसेंदिवस घट होत आहे. अशा परिस्थितीमध्ये तुम्ही तुमच्या घराचा आसपास सायकल व इलेक्ट्रिकल गाड्या भाड्याने द्यायचा व्यवसाय सुरू करू शकतात. जे पण लोक आरोग्याबाबत जागरूक असतात ते तुमच्याकडून इलेक्ट्रिकल सायकल भाड्यावर घेऊन जातील आणि ज्या लोकांना कमी खर्चात प्रवास करायचा आहे ते इलेक्ट्रिकल मोटरसायकल भाड्यावर घेऊन जातील.

तुम्ही हा व्यवसाय सुरू करणार असाल तर तुम्हाला ग्राहकाकडून त्यांचे ओरिजनल आधार कार्ड पॅन कार्ड असे डॉक्युमेंट सायकल किंवा इलेक्ट्रिकल मोटरसायकल भाड्याने देण्यापूर्वी घ्यायचे आहेत. ग्राहकाकडून ओरिजनल डॉक्युमेंट घेतल्यामुळे तुमची वस्तू चोरी जाण्याचा जाण्याची शक्यता राहत नाही. हा व्यवसाय तुम्ही 2 ते 4 लाख रुपये इन्वेस्टमेंट करून सुरू करू शकतात आणि चांगले पैसे कमवू शकतात.

टेलरिंग व अल्टरेशन शॉप :-

माणसाच्या प्राथमिक गरजांमध्ये कपडे येतात त्यामुळे टेलरिंग व्यवसायाची डिमांड कधी कमी होणार नाही.तुम्ही तुमच्या घराच्या आसपास टेलरिंग व अल्टरेशन शॉप ओपन करू शकतात.जर तुम्हाला टेलरिंग व अल्टरेशनचा शॉप व्यवसाय सुरू करायचा असेल तर तुम्हाला टेलरिंग मशीन चालवता येणे आवश्यक आहे.जर तुम्हाला टेलरिंग मशीन चालवता येत नसेल तर तुम्ही माणसे कामाला ठेऊन सुद्धा हा व्यवसाय करू शकतात.

टेलरिंग व अल्टरेशन शॉप व्यवसाय सुरू करण्यासाठी तुम्हाला खूप मोठ्या जागेची आवश्यकता नाही. जर तुमच्याकडे इन्व्हेस्टमेंट करायला बऱ्यापैकी पैसे असतील तर तुम्ही चारशे ते पाचशे स्क्वेअर फुट जागेत हा शॉप सुरू करू शकतात. तुम्ही सुरुवातीला 3 ते 4 टेलररिंग मशीन घेऊन हा व्यवसाय सुरू करू शकतात.

रुपये 99 शॉप :-

तुम्ही खूप सारे असे दुकान पाहिले असतील ज्यामध्ये वस्तू एकाच किंमतीवर उपलब्ध असतात. मार्केटमध्ये असे खूप सारे होलसेलर व डिस्ट्रीब्यूटर आहेत जे तुम्हाला सारे प्रॉडक्ट प्रोव्हाइड करतात. या प्रॉडक्टची रेंज 40 ते 60 रुपयांच्या दरम्यान असते. तुमच्या शॉपमध्ये प्रत्येक प्रॉडक्ट 99 रुपयाला विकले जाईल व त्या वस्तूची खरेदी किंमत 40 ते 60 रुपयाच्या दरम्यान असणार आहे. काही वस्तू मागे तुम्हाला जास्त प्रॉफिट होईल तर काही वस्तू मागे कमी प्रॉफिट होईल परंतु तुम्हाला एकंदरीत चांगले प्रॉफिट होईल.

मित्रांनो जर तुम्हाला अश्या प्रकारचा शॉप सुरु करायचा असेल तर तुमच्याकडे चारशे पाचशे स्क्वेअर फुट जागेचा शॉप हवा. तुम्हाला फर्निचर अशाप्रकारे लावावे लागेल की तुमचे सारे प्रॉडक्ट कस्टमरला व्यवस्थित दिसतील व ते खरेदी करतील.

कटिंगचे दुकान :-

कटिंगचे दुकान सुरू केल्यास तुम्हाला सुरुवातीच्या काळात इन्वेस्टमेंट लागते त्यानंतर तुम्हाला जास्त इन्वेस्टमेंटची गरज पडत नाही. कटिंगचे दुकान सुरू करण्यासाठी तुम्हाला 1 ते दीड लाख रुपयांचे भांडवल लागेल. कटिंग व दाढी व इतर सर्विसेस देऊन त्यामध्ये मिळणारे प्रॉफिट मार्जिन जास्त असणार आहे.

जर तुम्हाला स्वतःला कटिंग दाढी येत असेल तर तुम्ही तुमच्या कटिंगच्या शॉप वर स्वतः उभे राहू शकता किंवा तुम्हाला कटिंग व दाढी येत नसेल तर तुम्ही माणसे कामाला ठेवून हा व्यवसाय सुरू करू शकतात. तुम्ही त्या कटिंग कामगारांना पगारावर किंवा पार्टनरशिप वर कामाला ठेवू शकतात. कटिंग चे दुकान तुम्ही गर्दीच्या ठिकाणी ठेवले तर जास्त ग्राहक येतील व तुमचा नफा जास्त होईल.

गिफ्ट शॉप :-

आजकाल लोक एकमेकांना खूप मोठ्या प्रमाणात गिफ्ट भेट देतात परंतु गिफ्ट शॉपची संख्या फार कमी प्रमाणात पाहायला मिळते. या व्यवसायात तुम्हाला काही सिलेक्टेड गिफ्टचे प्रॉडक्ट ठेवायचे आहेत आणि गिफ्ट अशा प्रकारे ठेवायचे आहेत की शॉप मध्ये आलेला कस्टमर त्या वस्तू विकत घ्यायलाच पाहिजे.

गिफ्ट शॉप व्यवसायात तुम्हाला नवीन प्रकारचे गिफ्ट ठेवायला लागतील. गिफ्ट प्रॉडक्ट मागे तुम्हाला 20 ते 50 टक्के प्रॉफिट होऊ शकते.

आर्टिफिशियल ज्वेलरी शॉप :-

आर्टिफिशियल ज्वेलरी शॉप व्यवसायामध्ये आर्टिफिशियल ज्वेलरी सोबत तुम्ही महिलांना लागणारे इतर प्रॉडक्ट सुद्धा ठेवू शकतात. तुमच्या शॉपमध्ये तुम्हाला महिलांच्या लेटेस्ट स्टाईलच्या ज्वेलरी उपलब्ध करून द्यायचे आहेत.

आर्टिफिशल ज्वेलरी शॉप मध्ये तुम्हाला 30 टक्के ते 100 टक्केच्यावर प्रॉफिट होऊ शकते. अशा प्रकारचा शॉप सुरू करण्यासाठी तुम्हाला दीड ते अडीच लाख रुपये भांडवलाची आवश्यकता असणार आहे.

किराणाचे दुकान :-

मित्रांनो आपल्या घरामध्ये प्रत्येक दिवशी किराणा मालाची आवश्यकता असते.आपल्या जेवण बनवण्यापासून बऱ्याच साऱ्या गोष्टीमध्ये किराणा दुकानात मिळणाऱ्या वस्तूंची गरज असते. हा एक असा व्यवसाय आहे जो कायम चालत राहील व त्याचा कोणता सिझन नाहीये व कोणता टाईम नाहीये.किराणा व्यवसाय 24 तास व बाराही महिने चालणारा व्यवसाय आहे.

बऱ्याच साऱ्या कंपनीनी सुद्धा आज मोठे मोठे ग्रोसरी शॉप सुरू केले आहेत व ते चांगले प्रॉफिट कमावतात.जर तुम्हाला कायम चालत राहील असा व कमी भांडवलमध्ये व्यवसाय करायचा असेल तर तुम्ही किराणाचे दुकान ओपन करू शकतात.तुम्हाला एक छोट्या किराणा माल दुकान उघडायचे असेल तर तुम्हाला 3 ते 5 लाख रुपयांची इन्व्हेस्टमेंट लागते.

Leave a Comment